DCF कार्यालय प्रागंणात WWNF स्थापन झाल्याचे जाहीर करण्यात आले संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावल येथे Walk With Nature Foundation च्या यावल तालुका कार्यकारणीच्या गठन, रचना, जबाबदाऱ्या तसेच संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
Walk With Nature Foundation चे संस्थापक अध्यक्ष श्री. भूषण सुभाष पाठे यांच्या निसर्ग, पक्षी व वन्यजीव संवर्धनातील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत नवराष्ट्र यांच्या वतीने ‘वन्यजीव निसर्ग संवर्धक पुरस्कार’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
हा सन्मान निसर्ग व वन्यजीव संवर्धनासाठी सुरू असलेल्या कार्याला मिळालेली प्रेरणादायी पावती आहे. 🌿
Bhusawal येथे निर्जनस्थळी झाडाला बांधून सोडलेल्या श्वानाची Walk With Nature Foundation आणि गोरक्षक टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सुटका केली. श्वानाला पाणी व खाद्य देऊन पुढील उपचार व काळजीसाठी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली.